एच.ए.च्या कामगार लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे (२) श्रमिक साखळी आणि १४ नोव्हेंबरचे लाक्षणिक उपोषण - अरुण बोऱ्हाडे
एच.ए.च्या कामगार लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे (२) श्रमिक साखळी आणि १४ नोव्हेंबरचे लाक्षणिक उपोषण © अरुण बोऱ्हाडे दिनांक १ नोव्हेंबर २००३ रोजी सुरु झालेले घंटानाद आंदोलन हळुहळू वाढत गेले. गेले बारा-तेरा दिवस नित्यनेमाने सकाळी, दुपारी आणि सायंकाळी शिफ्टड्युटीप्रमाणे कामगार सहकारी आंदोलन मंडपात येत. सकाळी कंपनी सुरु होण्यापूर्वी काहीवेळ, पुन्हा दुपारी जेवणाच्या सुट्टीत आणि सायंकाळी ४.३० वाजता कंपनीची सर्वसाधारण पाळी सुटल्यानंतर सहा- साडेसहा वाजेपर्यंत सर्वजण घंटानाद करून धरणे मंडपात बसायचे. वृत्तपत्रांतून दररोज येणाऱ्या बातम्या वाचून शहरातील विविध कारखान्यांतील कामगार संघटनांचे पदाधिकारी व कामगार गटागटाने आंदोलनस्थळी येवून आंम्हाला पाठिंबा जाहीर करीत होते. त्याचप्रमाणे सामाजिक संघटनांचेही पदाधिकारी येवून पाठिंबा म्हणून आमच्या धरणे आंदोलनात आमच्यासह बसत होते. दररोज कोणीतरी पाठिंबा देणारी भाषणे करायचे. विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी येवून कामगारांच्या मुलाखती घेत, त्यावेळी आजच्या इतके इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिन्या नव्हत्या आणि पत्रकार प्रत्यक्षात जावून बातम्या करीत असत. पोलिस...