श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत. @ लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे (मोशी) बापरे ! केवढी ती तयारी ! सहा-सात फुट खोल आणि अडीच-तीन फुट रुंदीची मोठमोठी आखीव रेखीव आणि बांधीव अशी तीनचार चुलांगणे, त्यासाठी खास मागविलेली लाकूडफोड, पंचावन्न - साठ पोती बेसनपीठ, तेवढेच तेलाचे डबे, तशीच साखरेची पोती, शंभरावर बटाट्याची पोती आणि बरेच काही साहित्य सामग्री, सोबतीला राबणारे असंख्य हात ! हा सारा सरंजाम कशासाठी हे कळालेच असेल ! प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा मोशीगावचा पावन पवित्र सोहळा, अर्थात श्री नागेश्वर महाराजांचा भंडारा उत्सव ! प्रतिवर्षी महाशिवरात्री आली की दुसऱ्या दिवशी येणाऱ्या भंडाऱ्याची चाहूल लागते. एकाचवेळी पाचशे-हजार नव्हे, तर सत्तर- पंचाहत्तर हजारांहून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. श्री नागेश्वर महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मोशीतील आमराईत हा पवित्र सोहळा मागिल सुमारे पावणेदोनशे वर्षांपासून अव्याहतपणे चाललेला आहे. पुणे नाशिक राज्य महामार्गावरील मोशी हे आमचे गांव. पुण्याहून जेमतेम वीस किलोमीटर अंतर. सर्वसाधारण गावाची रचना असते,...
Comments
Post a Comment