''गुलामगिरी'' - अरुण बोऱ्हाडे (कवी, कामगार नेते)

 गुलामगिरी !


भारतीय राज्यघटनेचा 

आम्ही आदर करतो.

तरिही आम्ही कष्टकऱ्यांना 

भरदिवसा लूटतो !


लूटारूंच्या टोळ्या आम्ही 

राजकारणासाठी वापरतो !


गुलामगिरी विरोधात लढले,

देशभक्त आणि क्रांतिकारक. 

मायभूसाठी त्यांनी बलिदान दिले,

हेही आम्हांला ठाऊक आहे.


आता आम्ही स्वतंत्र भारतात

कष्टकऱ्यांची नवी गुलामगिरी आणणार !


नकोत आंम्हा देशभक्त कोणी !

नको आंम्हाला मार्क्सवाद, साम्यवाद,

नको लोकशाही समाजवाद..!

नकोच कोणाचा आदर्शवाद !


आंम्हाला हवाय कोणत्याही

राजकीय नेत्याचा फक्त आशिर्वाद !


मग बघा आम्ही धिंगाणाच घालणार..

रिक्षावाले, पथारीवाले यांना हप्ते ठरविणार.

हमाल, माथाडी, बांधकाम मजूरांची दलाली 

आणि सर्वच कष्टकऱ्यांची लूटमार करणार ! 


मग शहरातील मान्यवर आमची दखल घेतील,

प्रतिष्ठित म्हणून तेच आमची उठबैस करतील !


कष्टकऱ्यांच्या श्रमाचे आणि रक्ताचे

आम्ही सर्वांसमोर शोषण करणार !

आम्ही लोकशाही राज्यात राहूनच,

पुन्हा नवीन गुलामगिरी आणणार !! 

...

@ अरुण बोऱ्हाडे ...✍ (१५/०५/२०२०)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे