श्री. अरुण बोऱ्हाडे : एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व


           

            पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरीतील कामगार क्षेत्रात एका नावाचा बोलबाला आपण नेहमीच ऐकत आलो आहे आणि ते नाव म्हणजे कामगार नेते श्री.अरुण बोऱ्हाडे. पिंपरी चिंचवडमध्ये येणा-या मोशी या गावचा हा सुपूत्र, वडिल मुख्याध्यापक आणि आई गॄहिणी. सुसंस्कॄत असा परिवार, लहानपणापासूनच आई वडिलांचे संस्कार त्यांना लाभले. खऱ्या खोट्याची पारख, माणसे ओळखण्याची कला त्यांना शालेय जीवनातच आली. शिक्षणानंतर अर्थार्जनासाठी पिंपरीतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स म्हणजेच HA कंपनीत नोकरी स्वीकारली. नोकरी करत असताना कंपनीतील कामगारांना भेडसावणारे प्रश्न, अडचणी सोडविण्याच्या तळमळीतून त्यांची कामगार संघटनेशी नाळ जोडली गेली, ती आजतागायत टिकून आहे. संघटनेच्या माध्यमातून काम करताना त्यांनी नेहमी निःस्वार्थी भाव जपला. ते कधी कोणाच्या कपभर चहालासुध्दा मिंधे झाले नाहीत. म्हणून आज कामगार क्षेत्रात  त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. एकीकडे आज आपण पाहतो, अनेक स्वयंघोषित कामगार नेते आणि त्यांनी आपली केलेली आर्थिक प्रगती कुठे आणि दुसरीकडे अरूण बोऱ्हाडेंसारखा प्रामाणिक, निर्मळ मनाचा, कोणाचा एक रूपया न घेता कामगारांचे प्रश्न सोडविणारा अनमोल हिरा कुठे. म्हणूनच आज आपण पाहतो आदरणीय शरद पवारसाहेब सुध्दा अरुणरावांचा आदर करतात. वेळोवेळी कामगार क्षेत्राशी निगडित जे प्रश्न, अडचणी असतील तर त्यासंदर्भात चर्चा करतात. खा. सुप्रियाताई सुळे असतील किंवा मा.अजितदादा पवार असतील, यांच्याशीसुध्दा अरुणरावांचे घनिष्ठ संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते राजकीय क्षेत्रातही काम करतात. पक्षाचे मुख्य संघटक म्हणून काम करत असताना पक्षाची ध्येयधोरणे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करत असतात. पक्षाचे मार्गदर्शक म्हणून बरीचशी राजकीय मंडळी त्यांचे मार्गदर्शन घेताना दिसतात. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कामगार क्षेत्रातील  त्यांचा अभ्यास, अनुभव वाखाणण्याजोगा आहे. याची प्रचिती त्यांच्यासोबत असताना अनेकदा अनुभवयास येते. अर्थकारणाचा एवढा अभ्यास असणारा हा माणूस आपल्या व्यक्तिगत जीवनात या गोष्टी पासून नेहमी चार हात दूरच राहिला. याला कारण फक्त आईवडिलांचे संस्कार, त्यांच्याजागी दुसरे कोणी असते तर ...विचारही न केलेला बरा.! असो एवढयावरच थांबतील ते अरूणराव कसले, पुढे जाऊन पाहिले तर कुणी म्हणतं.. अरुणराव पत्रकार आहेत, कुणी म्हणतं अरूणराव कवी आहेत, लेखक आहेत. कुणी म्हणतं अरुणरावांना आम्ही गिर्यारोहक म्हणुन ओळखतो. एका माणसाच्या ठायी एवढे गुण, कला असू शकतात, यावर विश्र्वास बसत नाही. अशा या हरहुन्नरी व्यक्तीमत्वाने या शहरात नगरसेवक म्हणूनही आपली कारकीर्द गाजवली आहे. खरं तर माझ्यासारख्या अनेक कार्यकर्ते मंडळींची हिच इच्छा आहे की, अशा या अनमोल हिऱ्याला पक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी दिली पाहिजे. कारण पक्षश्रेष्ठींपुढे त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही आणि मागणारसुध्दा नाहीत. म्हणून त्यासाठी तुम्ही, आम्ही, आपण सर्वांनी नेते मंडळींना गळ घातली पाहिजे. शेवटी एकच सांगतो की
अरुणराव एक व्यक्ती नाही तो एक विचार आहे. अरुणराव एक जीवन नाही तर एक संस्कार आहे.
अशा हया सर्वक्षेत्रात पारंगत व्यक्तिमत्वाचा २७ डिसेंबर हा जन्मदिवस. अर्थात वाढदिवस.या वाढदिवसाच्या आंम्हा  सर्वांकडून आपणांस मनापासून हार्दिक शुभेच्छा.

लेखक - श्री अलंकार हिंगे
मोशी
(अवसरी, ता.आंबेगाव.)

Comments

Popular posts from this blog

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

'शरद पवार : दुःखातही मनाला उभारी देणारा अलौकिक लोकनेता'' : अरुण बोऱ्हाडे

"कष्टकरी कामगारांची, एक अधुरी कहाणी..! सामाजिक चिंतनाचा विषय" लेखकः अरुण बोऱ्हाडे